मीरा रोड पोलीस ठाण्यात आरोपींचे दम मारो दम; मुद्देमाल कक्षात डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मीरा रोड पोलीस ठाण्याच्या मालमत्ता कक्षात दोन आरोपींनी सिगारेट ओढत डान्स केला. या दम मारो दमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींना चोरीच्या एका गुन्ह्यात चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

मीरा रोड पोलिसांनी चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अंश राज, रोहित सिंह, रेहान सय्यद या आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. या आरोपींना दहशतवादविरोधी पथकाच्या खोलीत अत्यंत महत्त्वाचा फायली असलेल्या ठिकाणी तात्पुरते थांबवण्यात आले. त्या वेळी आरोपींनी या महत्त्वाच्या कक्षात सिगारेट ओढत डान्स केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी दम मारो दमचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरलही केला. ‘हम कहा है… मीरा रोड पोलीस थाने में है…’ असे बोलून हे आरोपींनी विचित्र पद्धतीने डान्स केला