
ऍमेझॉन प्राईमवरील मिर्झापूरचा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऍमेझॉनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून प्रेक्षकांनाही ही खुषखबर दिली आहे.
Ek kabootar laya hai udti khabar.. Pata karne ke liye karlo thoda sabar @PrimeVideoIN #MS2W pic.twitter.com/Cxp23r6TpM
— MirzapurAmazon (@YehHaiMirzapur) August 21, 2020
2018 मध्ये मिर्झापूरचा पहिला सीजन आला होता. प्रेक्षकांनी ही सीरीज विशेष पसंती दर्शवली होती. नोव्हेंबरमध्ये मिर्झापूरचा टीझर लॉन्च करण्यात आला होता. ऍमेझॉननने अजूनतरी ही सीरीज कधी रीलीज होईल हे जाहीर केले नाही. परंतु पुढील महिन्यात ही सीरीज प्रदर्शित होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या वेबसीरीजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फैजल, द्विव्येंदू, श्वेता त्रिपाठी दिसणार आहेत.




























































