सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या जोडीची उत्सुकता

सामना प्रतिनिधी । मुंबई

येत्या 28 जूनला प्रदर्शित होणार्‍या ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटातील सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या ग्लॅमरस जोडीची सध्या रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मंत्रा क्हिजन प्रस्तुत हा चित्रपट समीर जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात राजन भिसे, सविता प्रभुणे, अकिनाश नारकर, राधिका विद्यासागर या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा पार पडला. या प्रसंगी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आलाप देसाई, आनंदी जोशी यांच्या गाण्यानेदेखील सोहळ्यात बहार आली. ‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होते.