
सामना ऑनलाईन । मीरत
आपला एक पोलीस कॉन्सेटबल पाच महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे उत्तर प्रदेशातील पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या चौकशीत बेपत्ता कॉन्सटेबल तिहार तुरुंगात आजन्म तुरुंगवासाची शिक्षा भोगत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. कंवरपाल सिंग असे त्या कॉन्सटेबलचे नाव असून नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या दीर्घ रजेनंतर तो सेवेत दाखल झाला नाही.
सिंग हा उत्तर प्रदेशातील सशस्त्र दलातील माजी कर्मचारी होता. 22 मे 1987 रोजी घडलेल्या मीरतमधील हाशीमपुरा हत्याकांडातील तो आरोपी होता. या हत्याकांडात 42 मुस्लीमांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिंग याला दिल्ली उच्च न्यायालयाने 31 ऑक्टोबर 2018 रोजी 15 जणांसह आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच 22 नोव्हेंबरपूर्वी शरणागती पत्करण्याचे निर्देश दिले होते. तसेच 15 नोव्हेंबरपासून तो दीर्घ रजेवर होता. त्यामुळे तीन महिन्यानंतरही तो सेवेत रुजू झाला नाही. सेवत रुजू झाला नसल्याने 1 एप्रिलला त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच त्याची माहिती मिळवण्यासाठी विभागीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या चौकशीत हाशीमपुरा हत्याकांड प्रकरणी सिंग तिहार कारागहात आजन्म कारावासची शिक्षा भोगत असल्याचे उघड झाले. सुमारे 31वर्षापूर्वीच्या या प्रकरणात सिंग यांना 15 जणांसह आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिंग तीस हजारी नयायालयासमोर हजर झाल्यानंतर त्याला तिहार कारागृहात पाठवण्यात आले. त्यामुळे ते पन्हा सेवत धाकल झालले नव्हते.
























































