
आजही आपल्या समाजात महिलांच्या पाळीचा बाऊ केला जातो. सार्वजनिक ठिकाणी त्याबाबत बोललं जात नाही, साधं पॅड घेताना देखील अनेक महिला लाजतात. त्यात जर अतिस्त्रावामुळे कधी कपड्याला डाग लागला की तर मग अनेकींना मेल्याहून मेल्यासारखं होतं. मग ओढणी किंवा बॅगने तो लपवणं, मैत्रीणीला मागे चालायला लावणं असे प्रकार ते करत असतात. मात्र महिलांच्या याच बुजरेपणावर भाष्य करणारी एक पोस्ट अभिनेत्री मिथीला पालकरने शेअर केली आहे.
मिथिलाने तिचा एक बोल्ड फोटोही या पोस्टसोबत शेअर केला असून त्यात तिच्या पॅटला लाल डाग लागलेला दिसत आहे. ‘माझ्या दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी मला माझे पहिले पिरियड्स आले. माझे कपडे रक्ताने भरत असताना मी पेपर पूर्ण करायच्या घाईत होते. सुदैवाने, माझा गणवेश गडद रंगाचा होता. त्यामुळे तो डाग दिसला नाही. पण जर त्या दिवशी मी सफेद स्कर्ट घातला असता तर मला त्या विचित्र नजरांचा सामना करावा लागला असता. मी सुदैवी होते. माझे मित्र मैत्रीणी व कुटुंबीय हे माझ्ासोबत होते. त्यांनी पिरियडचा फार बाऊ केला नाही. पण आजही आपल्या समाजातील एक मोठा घटक पाळी हा शब्द देखील उच्चारायला कचरतो. त्यामुळे जेव्हा मायकारमेसी या संस्थेने मला या कॅम्पेनविषयी विचापलं मी तयार झाले. या कॅम्पेनमुळे आम्ही पाळीबद्दल असलेला हा बुजरेपणा जरी पूर्ण काढू शकत नाही. पण त्या मात्र यातून एक जरी महिला तिच्या मनातील ही भीती काढू शकली, एका महिलेने जरी त्याबाबत सकारात्मकता दाखवली तर खूप बरं होईल’, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.



























































