काँग्रेसला मोठा धक्का; आमदार अल्पेश ठाकूर, धवलसिंह झाला यांचा भाजपमध्ये प्रवेश

168

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार अल्पेश ठाकूर आणि धवलसिंह झाला यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघाणी यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही आमदारांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

याआधी काँग्रेस आमदार अल्पेश ठाकूर आणि धवलसिंह झाला यांनी गुजरात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राज्यसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधात मतदान केल्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

गांधीनगरमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि ओबीसी नेते जुगल ठाकूर तर काँग्रेसकडून चंद्रिका चुडासमा आणि गौरव पांडय़ा यांनी निवडणूक लढवली. ‘माझ्या आत्म्याचा आवाज ऐकून देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणाऱ्या नेतृत्वालाही मी मतदान केले. अशी प्रतिक्रीया अल्पेश ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यावर व्यक्त केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या