पालघरमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर आणि कॉम्रेड अशोक ढवळे पुन्हा एकत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, वसई

पालघरची लोकसभा लढवण्यासाठी धुळवडीच्या मुहूर्तावर बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे यांना रंग लावत आघाडी झाल्याची घोषणा केली. यापुढे लोकसभेसह सर्वच निवडणुकांना आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

बविआ आणि माकपची मनोर येथे आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडीची घोषणा केली. पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे भाजपकडून निवडणूक लढवलेले खासदार राजेंद्र गावीत आता बहुजन विकास आघाडीकडे येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा अशा प्रश्नांची उत्तरे द्यायची नसतात असे सांगत त्यांनी या प्रश्नालाच बगल दिली.