आमदार राजन साळवी यांनी घेतला राजापूर तालुक्यातील कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांचा आढावा

463

 कोरोना व्हायरस संदर्भात आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी राजापूर तालुक्यातील ओणी प्राथमिकआरोग्य केंद्र व रायपाटण ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र. जैतापूर तसेच ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे भेट देऊन कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्य व उपाययोजनाचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालय राजापूर व रायपाटण ग्रामीण रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या कोरोना कक्षाची पाहणी करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्सेस यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर राजापूर तहसीलदार कार्याल तसेच राजापूर नगरपंचायत कार्यालय येथे भेट देऊन तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रसारथांबण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी जनतेला घराबाहेर पडू नये तसेच आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये कोणी पर जिल्हातून, परराज्यातून, परदेशातून कोणी आले असल्यास प्रशासनाला त्याबाबत माहिती द्या, गर्दी करू नका, प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजन साळवी यांनी केले आहे त्याप्रसंगी राजापूर तहसीलदार श्रीम. प्रतिभा वराळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गारुडी, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश स्वामी, वैद्यकीय अधिकारी श्री. चव्हाण, स्टाफ नर्स हर्डीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सायली पाध्ये, डॉ. पडवळ, विभागप्रमुख वसंत जड्यार, विभागीय संघटक उमेश पराडकर, नगरसेवक तथा गटनेता विनय गुरव, सरपंच रेखा कोंडेकर, उप विभागप्रमुख राजन कोंडेकर, माजी उपविभाग प्रमुख मंगेश मांजरेकर, गिरीश कंगुटकर, आडविलकर , राकेश दांडेकर व मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या