
राज्य सरकारने आज सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून एमएमआरडीएच्या सह आयुक्तपदी एस. राममूर्ती तर शीतल उगले यांची सोलापूरच्या महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची बदली नागपूर येथे वस्त्रोद्योग संचालक, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली भंडारा जिल्हाधिकारी, बुलढाणा जिह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची बदली नागपूर जिह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तर एस. एम. कुरकोटी यांची बदली बुलढाणा जिह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे.





























































