पावसाळी आव्हानासाठी एमएमआरडीए सज्ज, मुंबईकरांच्या मदतीसाठी हेल्पलाइन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पावसाळय़ात निर्माण होणाऱया आव्हानांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सज्ज झाले आहे. झाडे कोसळणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूककोंडी आदींसंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी एमएमआरडीएचा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहेत.

नियंत्रण कक्षांमध्ये अभियंते आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रकल्पांच्या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून हे कर्मचारी व अभियंते सक्रिय राहतील. महापालिका, वाहतूक पोलीस, बेस्ट, अग्निशमन दल अशा विविध संस्थांच्या संपर्कात राहून ते काम करतील.

सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही अशा परिसरात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त क्षमतेचे पाणी उपसा पंप तिथे उपलब्ध करून देण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.

नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी
022-26591241, 022-26594176, 8657402090, 1800228801 (टोल फ्री)