पडलेल्या मोबाईलमुळे घरफोडीचा भांडाफोड, दोघांविरुद्ध गुन्हा

1048

लातूरच्या रेणापूर तालूक्यातील मौजे इटी येथे घर फोडून रोख रक्कम आणि सोयाबीन चोरुन नेण्यात आले होते. परंतू चोरट्यांचा मोबाईल तिथे पडल्यामुळे ही चोरी उघडकीस आली. रेणापूर पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महानंदा दासू कस्तूरे वय 50 वर्ष यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा लातूर येथे राहण्यास असल्याने त्याला भेटण्यासाठी त्या 10 तारखेस लातूर येथे गेलेल्या होत्या. लातूर येथून परत आल्यानंतर त्यांना घरासमोरच्या अंगणात सोयाबीन पडलेले दिसले. घराची खिडकी उघडी दिसली. चोरट्यांनी घराच्या खिडकीमधून घरात प्रवेश करुन घरातील रोख रक्कम 2900 रुपये आणि तीन कट्टे सोयाबीन अंदाजे किंमत ३ हजार चोरुन नेलेले होते. घराच्या अंगणात एक मोबाईल सापडला. तो मोबाईल अर्जुन फुलचंद सुरवसे याचा होता. त्यामुळे गावातील नागरीकांसह त्याला विचारणा केली असता अर्जुन सुरवसे आणि त्याचा साथीदार दशरथ अंगद सुरवसे यांनी पैसे आणि सोयाबीन चोरल्याची कबूली दिली. तसेच चोरलेले सोनाबीन त्यांनी भगीरथ साळुंके याच्या दुकानात विकल्याची कबुली दिली. त्या दोघांनाही पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या