मोबाईल चोरट्याला नाशिकमधून अटक; डेक्कन पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल खरेदीच्या बहाण्याने दुकानातून 1 लाख 3 हजारांचे मोबाईल चोरणाऱ्याला डेक्कन पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तोयस संजय पाटील (वय 19, रा. सिडको, नाशिक ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी डेक्कनमधील सागर आर्केड इमारतीतील मोबाईल दुकानातून चोरट्याने 1 लाख 2 हजारांचे दोन मोबाईल चोरून नेले होते. त्याचा तपास करताना चोरटा नाशिकमध्ये असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाशिकमध्ये जात तोयसला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे, पांचाळ, गुजर, तरंगे, भांगले, वाघमोडे, लोंढे यांच्या पथकाने केली.