
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी लोकसभेत भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो, परंतु मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकत नाही असा अंदाज व्यक्त केला आहे.
Sharad Pawar, NCP chief: From what I can understand a little about politics, I can say that I don’t think Modi ji will be the Prime Minister after these elections. I am not an astrologer but I think that they will not get the required number of seats. pic.twitter.com/B9GdG5ZqBp
— ANI (@ANI) March 12, 2019
पवार म्हणाले की, “मला जेवढं राजकारणामधलं कळतं त्यावरून मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे. मी काही ज्योतिषी नाही परंतु भाजपला बहुमत मिळणार नाही. भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना मित्रपक्षाची मद घ्यावी लागेल आणि त्यासाठी पंतप्रधानपद दुसर्या व्यक्तीला द्यावे लागणार” असा अंदाज पवारांनी व्यक्त केला आहे.
Sharad Pawar: I think BJP won’t get a clear majority,they’ll get less no.of seats. They might be the single largest party. After being the single largest party, they won’t have a desired PM. They’ll have to seek other parties help&if that happens they’ll have to look for a new PM https://t.co/jyuYJrmVAi
— ANI (@ANI) March 12, 2019
आधीचा अंदाज चुकला होता.
2014 च्या लोकसभा निवडणूकीत असाच अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला होता. भाजपला बहुमत मिळणार नाही आणि सत्तास्थापनेसाठी त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल. तेव्हा राजनाथ सिंह पंतप्रधान होऊ शकतात असा अंदाज पवारांनी व्यक्त केला होता. 2014 च्या निकालानंतर पवारांचा अंदाज साफ चुकला होता.
























































