पंतप्रधान मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार, भाजपच्या संसदीय बैठकीत निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. तीन तास चाललेल्या बैठकीत मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह उपस्थित होते.

2014 च्या निवडणूकीत मोदींनी गुजरातच्या वडोदरा आणि उत्तर प्रदेशच्या वाराणसी या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारंसघातून मोदी मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. नियमानुसार त्यांनी वडोदरातून राजीनामा दिला होता. वाराणसी हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला हातो. 1991 पासून ते 2014 पर्यंत फक्त 2004 चा अपवाद वगळता इथे भाजपचा उमेदवार जिंकला आहे. मोदींच्या आधी या लोकसभा मतदारसंघातून मुरली मनोहर जोशी निवडून गेले होते. 2014 ला हा मतदारसंघ जोशींनी सोडल्यानंतर राज्यसभेवर ते निवडून गेले.