ना कपिल, ना झहीर; 5 विकेट्स घेत शमीचे जबरदस्त कमबॅक, दिग्गजांच्या पंक्तीत मिळवले स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या चार सामन्यात बसवून ठेवलेल्या मोहम्मद शमीला रविवारच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली. त्याने देखील या मिळालेल्या संधीचे सोने केले. मोहम्मद शमी याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिला सामना खेळताना 5 विकेट्स घेतल्या. यासह त्याने या सामन्यात एक विक्रम करत दिग्गजांच्या पंक्तींत अग्रस्थान मिळवले आहे.

मोहम्मद शमीने आजच्या सामन्यात केलेला हा रेकॉर्ड करणारा तो हिंदुस्थानातील पहिला गोलंदाज ठरला आहे. टीम इंडियाकडून वर्ल्डकप खेळताना दोनदा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा करणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी 2019 ला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्यांदा अशी कामगिरी केलेली. मोहम्मद शमी व्यतिरिक्त कपिल देव, व्यंकटेश प्रसाद, रॉबिन सिंग, आशिष नेहरा, युवराज सिंह या हिंदुस्थानीा गोलंदाजांनी वर्ल्डकपमधील सामन्यात प्रत्येकी एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत.