पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लुटले 250 कोटी रुपये, 50 लाख ऍप युजर्संना चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अडीचशे कोटी रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. 50 लाख ऍप युजर्सना चुना लावला असून या प्रकरणी उत्तराखंडमधून एका आरोपीला अटक केली आहे. चार महिन्यात या आरोपीने हे पैसे लुटल्याचे समोर आले आहे.

उत्तराखंड पोलिसांनी या प्रकरणी पवन पांडेय या आरोपीला अटक केली आहे. चीनच्या स्टार्टअप योजने अंतर्गत पवन ग्राहकांना 15 दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत असे. काही जणांन पैसे दुप्पट मिळालेही होती. पवनचा चुना लावण्याचा व्यवसाय असाच सुरू राहिला असता. पण उत्तराखंडच्या एका युजरला पैसे परत न मिळाल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली. एका युजरने पैसे दुप्पट मिळण्याच्या आमिषाने आधी 93 हजार नंतर 72 हजार रुपये जमा केले होते. पण 15 दिवस उलटून गेल्यानंतरही या युजरला पैसे मिळाले नाहीत. तेव्हा त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी केली तेव्हा हा अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे निष्पण्ण झाले. 50 लाख युजरने हे ऍप डाऊनलोड केले आणि त्यात पैसे गुंतवले होते.

उत्तराखंड पोलिसांनी या प्रकरणी अखेर आरोपी पवन पांडेययला अटक केली. त्याच्याकडून 19 लॅपटॉप, 592 सिम कार्ड, 5 मोबाईएल फोन, 4 एटीम कार्ड आणि एक पासपोर्ट जप्त केला आहे.

युजरकडून मिळालेले पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये कन्व्हर्ट केले जात असत आणि परदेशात पाठवले जात असे तपासात समोर आले. या गुन्ह्याची माहिती आयबी आणि रॉ ला दिली असून ज्या परदेही व्यक्तींची नावे समोर आली आहे, त्यांची माहिती दुतावासाकडून मागितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.