
मनी लॉण्डरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने 13 जूनपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, सुनावणीनंतर न्यायालयातून बाहेर पडतानाच जैन यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनी लॉण्डरिंगप्रकरणी 30 मे रोजी ईडीने सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतले होते. अटकेनंतर त्यांना 9 जूनपर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते.




























































