जॅकलिनच्या आरोपांवर आता सुकेश चंद्रशेखरने दिले उत्तर, म्हणाला आरोप सिद्ध झाल्यास….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनीलॉंड्रींग आणि बॉलीवूड कलाकारांची फसवणूक करणारा महाठग सुकेश चंद्रशेखर तुरुंगात जॅकलीन फर्नांडिसला खूप मिस करतो. त्याने तुरुंगातून जॅकलीनला अनेक पत्रं लिहून त्याचे प्रेम व्यक्त केले होते. मात्र जॅकलीनने सुकेश तिला व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉईस नोट पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला होता. आता सुकेशने हे सारे आरोप फेटाळले आहेत. जॅकलिनने लावलेले आरोप सिद्ध झाल्याने वाटेल ती शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे म्हंटले आहे.

जॅकलिनने नुकतेच काही चॅटचे स्क्रिनशॉट दाखवत दिल्ली पोलिसांकडे महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तिने सुकेश तिला व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉईस नोट पाठवून त्रास देत असल्याचे सांगितले होते. शिवाय दिल्लीच्या पटयाला हाऊस कोर्टातही जॅकलीनने यासंदर्भात याचिका दाखल करत त्याला चिठ्ठ्या पाठवण्यापासून रोखावे अशी विनंती केली होती.

सुकेशने पहिल्यांदाच जॅकलीनला चिठ्ठी लिहीलेली नाही. याआधीही त्याने बऱ्याचदा जॅकलीनला चिठ्ठ्या लिहील्या आहेत. जेव्हा जॅकलीनने न्यायालयात सुकेशच्या चिठ्ठ्या भितीदायक आणि छळ असल्याचे म्हंटले आहे. तसेच सुकेशने त्यात तिला आव्हानही दिले आहे. या ठगाने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल केला. त्यात त्याने म्हटले आहे की, जॅकलिनच्या याचिकेत 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील अनेक तथ्ये लपवण्यात आली आहेत. सुकेश 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे.

अर्जात त्याने लिहीले की, जर मी पाठवलेल्या चिठ्ठ्यांमधून तिला घाबरवलं, धमकी दिली अशी लिहीलेली एक जरी गोष्ट खरी ठरली याशिवाय, ती पत्रे आर्थिक गुन्हे शाखा किंवा अंमलबजावणी संचालनालयात सुरू असलेल्या कोणत्याही खटल्याशी संबंधित असल्याचे सिद्ध झाल्यास, मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. त्याने या गोष्टीवरही प्रश्न केला की, जॅकलीनला एवढी पत्रं पाठवली मग मागच्या वर्षीच उच्च न्यायालयात का गेली नाही? असा सवालही त्यांनी केला.