उच्चदाब वीजवाहिन्यांच्या कामावर मॉनिटरिंग कमिटीचा वॉच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्चदाब वीज वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन 12 ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाला होता. भविष्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) कंबर कसली आहे. खंडित वीज पुरवठय़ाची चौकशी करण्यासाठी आयोगाने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने मुंबईचे पारेषण नेटवर्क सक्षम करण्याची शिफारस केली आहे. त्याची दखल घेत मुंबईत वाढीव वीज आणण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी उभारत असलेल्या कुडूस-आरे कॉलनी आणि विक्रोळी-खारघर या दोन उच्चदाब वीज वाहिन्यांचे काम वेळेत पूर्ण करण्याबरोबरच वॉच ठेवण्यासाठी आयोगाने चार सदस्यांची मॉनिटरिंग कमिटी नेमली आहे.