
दिल्ली पोलिसांनी सोमवारी हजार किलोंहून अधिक अवैध फटाके जप्त केले. याप्रकणी एका दुकानदाराला अटक करण्यात आली असून आरोपी जनरल स्टोअर्सच्या नावाखाली फटाके विकत होता. सणासुदीचा काळ असल्याने फटांक्याची अवैध विक्री होत असून पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रदूषण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांच्या विक्री आणि खरेदीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाईसाठी विशेष पथक नेमले आहे.
























































