दोन मुलांना विहिरीत ढकलून आईने जाळून घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire
फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, परतूर

रागाच्या भरात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून स्वतः पेटवून घेतले. या घटनेत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून महिला 80 टक्के भाजली आहे. परतूर-वाटूर रोडवर औचार कंडारी येथे शरद मुळे हे पत्नी सखुबाई व दोन मुलांसह राहतात. सखुबाईने मुलगा शिवराज (6) व मुलगी शिवानी (4) या दोघांना गावाजवळच्या विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर तिने स्वतःही पेटवून घेतले. आज दुपारी गावाजवळच्या विहिरीत अर्जुन सुरवसे याला दोन बालकांचे मृतदेह तरंगताना आढळले. परतूर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. चिंताजनक अवस्थेत महिलेला संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. सध्या तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रागाच्या भरात तिने हे कृत्य केल्याची चर्चा आहे.