
कौटुंबिक वादातून दोन चिमुकल्यांचा खून करून आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोलापूर शहरातील राजस्वनगर येथे घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. अथर्व चव्हाण (वय साडेतीन वर्षे) आणि आर्या चव्हाण (वय अडीच वर्षे) अशी खून झालेल्या दोन चिमुरडय़ांची नावे आहेत, तर ज्योती सुहास चव्हाण असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे.
विजापूर रोडवरील राजस्वनगर येथे राहणारे सुहास चव्हाण हे एसटी महामंडळात लिपिक आहेत. सकाळी त्यांचा पत्नीबरोबर वाद झाला होता. दरम्यान, सुहास चव्हाण हे कामावर गेल्यावर पत्नी ज्योती हिने मुलगा अथर्व व मुलगी आर्या या दोघांचा गळा आवळून खून केला व त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. टीक्हीचा आकाज काढकिलेला असल्याने मुलांचा आकाज कोणालाही ऐकू गेला नसाका. रात्री उशिरा सुहास हे कामाकरून घरी परत आल्याकर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह छत्रपती शिकाजी महाराज सर्केपचार रुग्णालयात तपासणीसाठी पाठकिले. मृत महिला ही स्कभाकाने तापट असल्याने हा प्रकार घडला असाका, असे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. सायंकाळी ही घटना परिसरात समजल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.




























































