अंधेरी येथे आगीत मायलेकी होरपळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरीच्या कृष्णकुंज इमारतीतील एका घरात लागलेल्या आगीत मायलेकी होरपळल्याची घटना आज दुपारी घडली. उपचारादरम्यान अस्मिता संतोष गुप्ता या महिलेचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अस्मिता या अंधेरी पश्चिमच्या कृष्णकुंज इमारतीत त्यांच्या मुलीसोबत राहत होत्या. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या घरात आग लागली. त्यात त्या दोघी गंभीर जखमी झाल्या. आगीची माहिती समजताच डी. एन. नगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या दोघी मायलेकींना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अस्मिताचा मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी 80 टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. नेमकी आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घडल्याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.