‘कुलस्वामिनी’चा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवीमातेच्या अगाध लीलेचे यथार्थ दर्शन घडवणारा ‘कुलस्वामिनी’ चित्रपट येत्या 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. दसऱयाच्या मुहूर्तावर चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘दौलत की जंग’पासून या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ढ लेकाचा’मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री चित्रा देशमुख यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार हे पोस्टरवरून सहज लक्षात येतंय. त्यामध्ये कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेल्या त्यांच्या फोटोच्या मागे साक्षात देवीचा फोटो दिसत आहे. जोगेश्वर ढोबळे यांनी दिग्दर्शन केले असून ही अल्ट्रा मीडिया ऍण्ड एंटरटेन्मेंटची निर्मिती आहे.