एसटी कर्मचाऱयांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची – खासदार संभाजीराजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱयांचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. मात्र, कर्मचाऱयांनी आज ज्या पद्धतीने आंदोलन केले ते अशोभनीय आहे. महाराष्ट्र राज्याची ही संस्कृती नाही, अशा शब्दांत भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी एसटी कर्मचाऱयांकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. आंदोलन करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. परंतु, कायदा हातात घेतला जाऊ नये. आम्ही एसटी कर्मचाऱयांच्या मागण्या मान्य होण्याच्या बाजूने आहोत. मात्र, अशा पद्धतीने आंदोलन अशोभनीय आहे, असे ते म्हणाले.

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही – टोपे
‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणे हा अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह प्रकार आहे. अशा प्रकारे हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पवार यांच्या घरावर केलेला हल्ला हे गुप्त कट-कारस्थान आहे. शरद पवार यांनी नेहमीच एसटी कर्मचाऱयांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे. संपाचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱयांना मर्यादेचे भान ठेवायला सांगणे आवश्यक होते,’ अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.