खासदार विनायक राऊत यांची कोरोनावर मात

vinayak-bhaurao-raut

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लोकसभा मतदार संघ आणि मुंबईत काम करत असताना खासदार विनायक राऊत यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 11 सप्टेंबरला नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी हितचिंतक आणि पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत. लवकरच आपण जनतेच्या सेवेसाठी मतदार संघात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या