खासदार विनायक राऊत यांनी घेतला बुरबांड आदर्श गावाचा लेखाजोखा

37

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील बुरबांड आदर्श गावाचा लेखाजोखा खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे घेतला. त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांची चाललेली दादागिरी ग्रामस्थांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शासनाकडून येणारा निधी याचे योग्य अधिकारी नियोजन करत नसल्याबद्दल सरपंच मनोज शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, संगमेश्वर पंचायत समिती सभापती सोनाली निकम, उपसरपंच संजय शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख अनिल मोरे, एम एस ई बी चे अभियंता माने, संगमेश्वर गटविकास अधिकारी जाधव, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती विलास चाळके, शिवसेना उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, ग्रामसेवक भुसारे आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गावामध्ये स्ट्रीट लाईट गणपतीच्या आत सुरू करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या