Mpox ने वाढवली चिंता! WHO ने घोषित केली जागतिक आरोग्य आणीबाणी

एमपॉक्स नावाच्या विषाणूने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने बुधवारी मोठी घोषणा केली आहे. आफ्रिकेमध्ये एमपॉक्सचा वाढता विळखा पाहता जागतिक आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित केली आहे. हा विषाणू आंतरराष्ट्रीय सीमांच्या पार पसरू शकतो, असा इशारा इशारा WHO ने दिला आहे.

अहवालानुसार, आतापर्यंत हा विषाणू 116 देशांमध्ये पसरला आहे. ज्यामध्ये acute ग्रेड 3 आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार यावर्षी आफ्रिकेमध्ये 14 हजारहून जास्त प्रकरणं समोर आली आहेत आणि 524 मृत्यू झाले आहेत. मागच्या वर्षीच्या आकड्यांपेक्षा हा आकडा जास्त आहे.

2022 मध्ये एमपॉक्सच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तसेच पश्चिमी, मध्य आणि पूर्व आफ्रिकी देशांमध्ये पसरत आहे. हा विषाणू पसरत असून अमेरीका आणि युरोपमधूनही काही प्रकरणं समोर येत आहेत.

आफ्रिकेच्या टॉप पब्लिक हेल्थ बॉडीच्या इशाऱ्यानंतर एमपॉक्सबाबत खंडात आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. हे संक्रमण वेगाने पसरत आहे, असे इशाऱ्यात म्हटले आहे. यावर्षी आतापर्यंत आफ्रिकेच्या बेटावर 17 हजारांपेक्षा जास्त संशयित एमपॉक्सची प्रकरणे आणि 517 लोकांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या 160 टक्क्यांनी वाढली आहे. जवळपास 13 देशांमधून एमपॉस्कचे प्रकरणी समोर आली आहेत, असे आफ्रिका रोग नियंत्रण केंद्राने सांगितले.

एमपॉक्स व्हायरसचा एक व्हेरिएंट-क्लेड आयआयबी 2022 मध्ये जगभरात पसरला होता. हा पुरुषांनी पुरुषांसोबत ठेवलेल्या संबंधातून पसरला होता. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. ही जवळपास 10 महिन्यांनी संपवली होती.

एमपॉक्स काय आहे? 

एमपॉक्सला आधी मंकीपॉक्सच्या नावाने ओळखले जात होते. हा विषाणुमुळे होणारा आजार असून तो आफ्रिकन भागात आढळतो. या विषाणूची ओळख 1958 मध्ये डेनमार्कच्या माकडांमध्ये झाली होती. त्यामुळे या आजाराचे नाव माकडांशी जोडलेले आहे. या आजारावर विशिष्ट असे उपचार नाहीत, पण तो बरा होतो.

एमपॉक्स लक्षणे

पुरळ, ताप, थकवा, डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायू दुखणे अशी एमपॉक्सची लक्षणे असतात. शिवाय लाल ठिपके, पुरळ उठतात. नंतर त्याचे फोड होऊन त्यात पू जमा होतो. काही काळाने हे फोड खरुज बनतात आणि पडतात. यामध्ये दोन ते चार आठवडे लागतात. याशिवाय तोंडावर, चेहरा, हात, पाय, योनी आणि गुदद्वारावरही जखमा होऊ शकतात.