
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या ‘राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020’च्या अंतिम निकालाची गुणवत्ता यादी आज जाहीर करण्यात आली. त्यात पुरुष आणि महिलांमध्ये अनुक्रमे प्रमोद चौगुले आणि रूपाली माने यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला. 3214 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. निकालानंतर उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर अवघ्या तासाभरातच गुणवत्ता यादी जाहीर केली गेली. एमपीएससीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले.
1)प्रमोद चौगुले ( राज्यात प्रथम क्रमांक) – ६१२.५० गुण
2) नितेश नेताजी कदम – ५९१.२५ गुण
3) रुपाली माने (मुलींमध्ये प्रथम क्रमांक) – ५८०.२५ गुण
4) शुभम जाधव – ५७३ गुण
5) अजिंक्य जाधव – ५६७ गुण
6) गिरीश पारेकर -५६६.५० गुण
7) वैभव शिंदे – ५६५.७५ गुण
8) अमोल परीहर – ५६५.५० गुण
9) महेश हरीशचंद्रे – ५६५ गुण
10) ज्ञानेश्वर पाटील – ५६४.५० गुण
































































