जे. जे. हॉस्पिटल फायनलमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ-‘एमआरआरकेएस’ रौप्य महोत्सवी चषक आंतर हॉस्पिटल टी-20 क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत जे. जे. हॉस्पिटल विरुद्ध नानावटी हॉस्पिटल यामध्ये 18 फेब्रुवारीला शिवाजी पार्क मैदानामध्ये होईल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जे.जे. हॉस्पिटलने बलाढय़ लीलावती हॉस्पिटल संघावर 4 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. सामनावीर रोहन म्हापणकरची (36 चेंडूत 34 धावा, 1 षटकार व 2 चौकार) धडाकेबाज फलंदाजी व भरत पेडणेकरचा (23 धावांत 3 बळी) अचूक मध्यमगती मारा यामुळे जे. जे. हॉस्पिटलचा अंतिम फेरीमधील प्रवेश सुकर झाला. रूपेश कोंडाळकर व जगदीश कोठारे यांनी लीलावती हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कामगार नेते व माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी एमआरआरकेएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रिकेटप्रेमी अभय हडप, उपाध्यक्ष राजन लाड, निवृत्ती देसाई, संजय कदम, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, विलास डांगे आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.