एमआरव्हीसी एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पॅटर्नचा अभ्यास करतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने 5 मेपासून एसी लोकलच्या तिकिटाचे दर निम्म्याने कमी केले असले तरी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने प्रवाशांचा आर्थिक स्तर आणि खर्च करण्याची ऐपत पुन्हा तपासून पाहत आह. एसी लोकलच्या वापराबाबत मुंबईकरांना प्रश्नमालिका देण्यात आली असून त्यात विविध प्रश्न विचारण्यात आले असून उत्तरासाठी विविध चार पर्याय देण्यात आले आहेत. प्रवाशांचा एसी प्रवासाचा पॅटर्न तपासण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ही प्रक्रिया सुरू केली आहे.

एसी लोकलच्या सिंगल जर्नी तिकिटाचे भाडे 5 मेपासून निम्म्याने कमी करण्यात आले असून पश्चिम आणि मध्य रेल्वेवर प्रत्येकी अतिरिक्त 12 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेवर 60 फेऱ्या तर पश्चिम रेल्वेवर 32 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. एसी लोकलच्या भाज्यासंदर्भात प्रवाशांचे अलीकडेच सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार एसी लोकलच्या सिंगल जर्नी तिकिटाचे दर निम्मे करण्यात आले. आता पुन्हा प्रवाशांकडून फिडबॅक घेतला जातोय.

प्रश्नांची सरबत्ती

नवीन भाडे लागू करण्यापूर्वी कशाने प्रवास करायचा?, कोणत्या वर्गाचे तिकीट काढायचा?, तिकीट खरेदी कशाच्या माध्यमातून करताय?, प्रवासाचा उद्देश काय?, दिवसातून किती वेळा प्रवास करताय?, तुमचे मासिक उत्पन्न किती आहे? असे प्रश्न प्रवाशांना विचारण्यात आले असून त्यांचा प्रतिसाद पाहिला जात असून त्यावर विविध वयोगटातील प्रवाशांना प्रश्न विचारले गेले आहेत.