चौकार-षटकारांच्या आतषबाजीत धोनीचा विश्वविक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव विकेट किपर

इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम (IPL 2024) सुरू असून यंदा धावांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. नवख्या खेळाडूंसह वरिष्ठ खेळाडूही चौकार-षटकारांच्या आतषबाजीत रंगले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही यंदाच्या हंगामात विस्फोटक रुप धारण केले आहे. शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या लढतीही धोनीने 9 चेंडूत 28 धावा कुटल्या. या खेळीसह त्याने अनेक विक्रम केले.

सीएसकेसाठी धोनी फिनिशरची भूमिका पार पाडत आहे. अखेरच्या दोन-तीन षटकांमध्ये येऊन तो चौकार-षटकारांची आतषबाजीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. वानखेडेवर हार्दिक पंड्याला त्याने लागोपाठ तीन षटकार खेचले होते. त्यानंतर लखनऊविरुद्धही धोनीने 300हून अधिक स्ट्राईक रेटने धावा केल्या.

शुक्रवारी 28 धावांची नाबाद खेळी करताच आयपीएलमध्ये वयाच्या 40शी नंतर 500 धावा करणारा धोनी पहिला खेळाडू बनला. धोनीने ख्रिस गेल याचा विक्रम मोडला. गेलने वयाच्या 40शी नंतर आयपीएलमध्ये 481 धावा केल्या होत्या. यासह आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला विकेट किपर बॅटर ठरला. धोनीनंतर दिनेश कार्तिकचा नंबर लागतो. त्याने 228 लढतीत 4363 धावा केल्या आहेत.

हिंदुस्थानी फलंदाजांचीच बॅट ठोकतेय धावा; अव्वल दहा फलंदाजांमध्ये सात हिंदुस्थानी आणि तीन विदेशी

सर्वाधिक स्ट्राईक रेट

धोनीने गेल्या हंगामात 182.46च्या स्ट्राईक रेटने 104 धावा केल्या होत्या. यंदा मात्र त्याचा स्ट्राईक रेट चांगलाच वाढला आहे. त्याने आतापर्यंत 255.38 च्या स्ट्राईक रेटने 87 धावा केल्या आहेत. गेल्या दोन आयपीएलमध्ये 50हून अधिक चेंडू खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनीचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम आहे. त्यानंतर अभिषेक शर्माचा नंबर लागला असून त्याने 205.26 च्या स्ट्राईक करेटने गोलंदाजांना चोपले आहे.

लखनऊचा नवाबी विजय; चेन्नईचा 8 विकेटच्या पराभवाने केला पाहुणचार