क्रिकेटपासून दूर असणाऱ्या धोनीचा ‘कमांडो’ लूक व्हायरल

613

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. विश्वचषकापासून धोनीने मैदानावर पाऊल ठेवलेले नाही. या दरम्यान धोनीने लष्करामध्ये सेवाही केली. क्रिकेटपासून दूर असणारा धोनी जयपूर विमानतळावर कमांडो अवतारामध्ये दिसून आला.

dhoni

धोनीने आर्मी रंगालाचा टी-शर्ट घातल्याचे दिसत असून डोक्यावर कमांडोसारखा काळा कपडा बांधलेला आहे. जयपूर विमानतळावर त्याचा हा लूक कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. कमांडो लूकमधील धोनीचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

dhoni3

धोनी कमांडो लूकमध्ये दिसल्यानंतर चाहत्यांनी त्याला घेराव घातला आणि त्याच्यासोबत फोटोही काढले. तब्बल 6 तास धोनी जयपूर विमानतळावरील ह़ॉटेलमध्ये होता. यानंतर तो विमानाने दिल्लीला रवाना झाला.

dhoni2

विश्वचषकानंतर धोनीने विश्रांती घेतली आणि लष्करात सेवा बजावली. जम्मू-कश्मीरमध्ये धोनीने लष्करी जवानांसोबत ट्रेनिंग घेतली. यावेळी तो जवानांच्या वर्दीमध्ये दिसून आला.dhoni4

आपली प्रतिक्रिया द्या