पाणी जपून वापरा…आज, उद्या 17 विभागांत 15 टक्के पाणीकपात

 मुंबई महानगरपालिका भांडुप जलशुद्धीकरण पेंद्रास पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेणार असल्यामुळे 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मंगळवार 9 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत 17 विभागांमध्ये 15 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

यामध्ये जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी बसवण्यासाठी काही कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी साधारणतः 24 तासांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामामुळे मुंबई शहर विभागातील ए पर्ह्ट परिसर, सी मुंबई सेंट्रल, डी ग्रँट रोड, जी दक्षिण वरळी, जी उत्तर विभाग दादर; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम वांद्रे परिसर, के पूर्व, के पश्चिम कुर्ला, पी दक्षिण गोरेगाव, पी उत्तर मालाड, आर दक्षिण कांदिवली, आर उत्तर दहिसर, आर मध्य बोरिवली विभाग आणि पूर्व उपनगरातील एन घाटकोपर, एल कुर्ला आणि एस भांडुप विभाग अशा एकूण 17 प्रशासकीय विभागांना होणाऱया पाणीपुरवठय़ात 15 टक्के कपात केली जाणार आहे.