
मुंबईस्थित ग्लोबल फार्मा कंपनी ग्लेनमार्कने कोविड-19 ग्रस्त प्रौढ रूग्णांवर उपचार करण्यासाठी सॅनोटीझच्या भागीदारीत हिंदुस्थानात पहिला नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे (फॅबीस्प्रे) लाँच केला आहे.
ग्लेनमार्कला देशाचे औषध नियामक, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे एक्सीलरेटेड अप्रुवल प्रक्रियेच्या उत्पादन आणि विपणनासाठी मान्यता मिळाली आहे.
कंपनीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “नेझल स्प्रेने हिंदुस्थानातील फेज III चाचण्यांचे टप्पे पूर्ण केले आहेत आणि 24 तासात व्हायरल लोडमध्ये 94 टक्के आणि 48 तासांत 99 टक्के घट यशस्वीपणे दाखवली आहे. नायट्रिक ऑक्साइड नेझल स्प्रे ( NONS) चाचण्यांदरम्यान COVID-19 रूग्णांमध्ये सुरक्षित असल्याचे आढळून आले. ग्लेनमार्क त्याचे FabiSpray या ब्रँड नावाने विक्री करेल.”



























































