पोलीसभरती गैरप्रकाराप्रकरणी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीसभरती लेखी परीक्षेत कॉपीप्रकरणी आणखी दोघांना मेघवाडी पोलिसांनी अटक केली. अंकुश काळे आणि बंडू ठुबे अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

मुंबई पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. मैदानी परीक्षेनंतर पात्र असलेल्या 83 हजार 746 उमेदवाराची यादी प्रसिद्ध झाली होती. 7 मे रोजी मुंबईतील 251 पेंद्रावर परीक्षा पार पडली. जोगेश्वरी येथील पेंद्रात एक विद्यार्थी हा संशयास्पद दिसला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्याकडे एक डिवाइस आढळून आले. कॉपीप्रकरणी त्या विद्यार्थ्याविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मांढरे याच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एकाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक बीड येथे गेले. बीड येथे चौकशी केल्यावर लहू नावाच्या इसमाचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने विद्यार्थ्याला डिवाइससाठी लागणारे सिम कार्ड पुरवले होते. लहूच्या चौकशीत अंकुश आणि बंडूचे नाव आले. त्या दोघांची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.