
डिजिटल अटकेच्या नावाखाली ठगाने महिलेची 30 लाखांची फसवणूक केली. अटक टाळण्यासाठी महिलेने तिचे सोने बँकेत गहाण ठेवले. घडल्याप्रकरणी मध्य सायबर पोलिसानी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार महिला या ज्येष्ठ नागरिक आहेत. जूनच्या पहिल्या आठवडय़ात त्यांना एक नंबरवरून फोन आला. ठगाने तो ट्राय प्राधिकरणातून बोलत असल्याचे भासवले. तिच्या नावाने सिमकार्ड नोंद आहे. त्या नंबरवरून काही जण लोकांना त्रास देतात तेव्हा महिलेने अशा प्रकारचे कोणतेही कार्ड घेतले नसल्याचे सांगितले. त्यानंतर ठगाने याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद अशा भुलथापा मारल्या. त्यानंतर तो फोन ठगाने दुसऱयाला ट्रान्सफर केला. त्याने तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवले. एक प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने 46 ते 47 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असून त्यातील काही रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली अशा त्याने भुलथाप मारल्या. अटकेची कारवाई टाळण्यासाठी महिलेने सोने बँकेत गहाण ठेवून 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले. ते पैसे विविध खात्यांत पाठवले. ठगाने तिला पैसे पाठवल्याची माहिती कोणालाही देऊ नये अशी धमकी दिली होती.