ठाणे – नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने दिव्यांगाला जाळले, धावत्या लोकलमधील धक्कादायक प्रकार

मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकील आसा आहे. नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने दिव्यांगाला देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकलमध्ये हा प्रकार घडला.

नशेसाठी वापरण्यात येणारे सोल्युशन हातावर टाकून दिव्यांगाला पेटवून देण्यात आले. सीएसएमटी ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये शनिवारी रात्री 10.45 ते 11 च्या सुमारास कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही घटना घडली. प्रमोद वाडेकर (अंदाजे वय – 35) असे जखमी दिव्यांगाचे नाव आहे.

प्रमोद वाडेकर हा मुका असून या हल्ल्यात त्याचा डावा हात संपूर्णपणे होरपळला आहे. त्याच्यावर सध्या केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्रमोदवर हल्ला करणाराही दिव्यांग असून हल्ल्यानंतर तो मुंब्रा स्थानकात उतरून गेला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.