कोविड रुग्णाची सेवा केल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी, सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील महिला सफाई कर्मचारी ट्रॅप

कोविडमुळे उपचारार्थ दाखल असलेल्या महिलेची शुश्रूषा केली म्हणून त्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 400 रुपये स्वीकारताना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील एक महिला सफाई कर्मचारी अॅण्टी करप्शन ब्युरोच्या कारवाईत ट्रॅप झाली.

हेमलता सोलंकी (33) असे त्या ट्रॅप झालेल्या सफाई कर्मचारी महिलेचे नाव आहे. 3 मार्च रोजी एक महिला कोविडमुळे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. दरम्यान, 7 मार्च रोजी महिलेचे पती त्यांना भेटण्यासाठी गेले असता हेमलता यांनी त्यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. मात्र लाच द्यायची नसल्याने अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या