एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया 4 तास 31 मिनिटांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

नागपूर शहरातील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे याने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे 16 किलोमीटर अंतर 4 तास 31 मिनिटांत पार करून एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. असा उपक्रम करणारे धुर्वे कुटुंबीय आशिया खंडात एकमेव ठरले आहे.

या साहसी उपक्रमाची सुरुवात सकाळी 7.52 वाजता एलिफंटा जेट्टी येथून झाली. सर्वप्रथम सार्थक धुर्वे याने सागराचे पूजन करून व श्रीफळ अर्पण करून अभियानाला सुरुवात केली. या उपक्रमाची नोंद घेण्याकरिता एशियन बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. संदीप सिंग, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर व नील लबडे, माजी उपजिल्हाधिकारी व स्व. वामनरावजी दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे, धनश्री दिवे, डीआयजी (मुंबई) कृष्णप्रकाश आदी उपस्थित होते.

जलतरणपटूच्या सुरक्षितेच्या दृष्टीने डॉक्टरांची प्रथमोपचार चमू माऊली बोटीवरून लक्ष ठेवून होते. सार्थक धुर्वे याने सागरात उडी घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर व नील लबडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संजय बाटवे तांत्रिक भूमिका बजावत होते. प्रत्येक मिनिटाला चारही जण जलतरणपटूच्या हाताच्या गतीची नोंद घेत होते.

फेसाळणाऱया लाटांचे आव्हान

सागरावरून घोंगावणारा व उंच उंच उसळणाऱया खाऱया पाण्याच्या लाटा याची तमा न बाळगता प्रति मिनिट 80 आर्म्स या गतीने पोहत होता. मध्ये-मध्ये त्याला फीडिंग देण्यात येत होते.सागरात 4 किमी अंतरानंतर आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व नागपूर पोलीस कॉन्स्टेबल सुखदेव धुर्वे सागरात झेप घेऊनप्रति मिनिट 100 आर्म्स या गतीने पोहत होता. सुखदेव नवा विक्रम नोंदविण्याच्या हेतूने पोहत होता.