11 वीसाठी महाविद्यालयांत 63 जादा तुकडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

दहावीच्या परीक्षेत अंतर्गत गुण बंद केल्यानंतर एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून महाविद्यालयांत अतिरिक्त तुकडय़ा वाढविण्याची घोषणा केली. त्यानुसार सरकारकडून विविध महाविद्यालयांत तुकडय़ा वाढविल्या आहेत. त्यानुसार महाविद्यालयांत 63 तर कनिष्ठ महाविद्यालयांत 20 जादा तुकडय़ांना मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या अतिरिक्त तुकडय़ा विनाअनुदानित तत्त्वावर असल्याने विद्यार्थ्यांना यासाठी भरमसाठ फीही आकारली जाणार आहे.

शिक्षण संचालकांनी दिलेल्या प्रस्तावानुसार या वाढीव तुकडय़ांना मंजुरी देण्यात आली आहे. या तुकडय़ा मंजूर करताना संबंधित महाविद्यालये, तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे. तुकडय़ा वाढविताना नियमानुसार पटसंख्या, त्याच प्रमाणे वाढीव तुकडय़ांसाठी त्यासाठचे शुल्क उपसंचालक कार्यालयात भरावे लागणार आहे. राज्यभरातील महाविद्यालयांत या तुकडय़ांचे वाटप करण्यात आले आहे.

ठाणे, नवी मुंबईतील कॉलेज
ठाण्याच्या मानपाडा येथील ट्विन्स हायस्कूलमध्ये, नवी मुंबईतील शिरवणे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, असदउल्ला खान इंग्लिश हायस्कूल, कौसा, ठाणे यांना विज्ञान शाखेच्या तर न्यू बॉम्बे सिटी ज्युनिअर कॉलेज, घणसोली, नवी मुंबईत कला शाखेची, जण गण मन विद्या मंदिर, डोंबिवली येथे वाणिज्य, विज्ञान शाखेची, वेदांता ज्युनिअर कॉलेज, ठाणे, विज्ञान शाखेसाठी, एस. एम. शेट्टी ज्युनिर कॉलेज, पवई कला व वाणिज्य शाखेसाठी तुकडी वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबईतील कॉलेज
के.व्ही.के. घाटकोपर सार्वजनिक स्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, घाटकोपर (प.) विज्ञान शाखेसाठी, युवाज ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ऍण्ड आर्टस, टिळकनगर वाणिज्य शाखेसाठी, क. म. शि. प्र. मंडळाचे शेठ ईश्वरदास हायस्कूल, कुर्ला (प.) वाणिज्य शाखेसाठी, वामनराव मुरांजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेसाठी, दिशा कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड सायन्स, भांडुप, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी, बीजेपीसी इन्स्टिटय़ूशन एम कर्वे मार्ग, वाणिज्य शाखेसाठी, विल्सन महाविद्यालय, मुंबई वाणिज्य शाखेसाठी, आर. सी. मारोती ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड सायन्स वाणिज्य शाखेसाठी, वासुदेव ज्युनियर कॉले ऑफ आर्टस् अंधेरी, वाणिज्य शाखेसाठी, भवन्स महाविद्यालय, अंधेरी वाणिज्य शाखेसाठी, नारायण ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स विज्ञान शाखेसाठी, भरडा न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फोर्ट कला व विज्ञान शाखेसाठी, घनश्यम दास जालान ज्युनिअर कॉलेज, जोगेश्वरी, मुंबई वाणिज्य शाखेसाठी, जे.ई.एस ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, जोगेश्वरी, वाणिज्य शाखेसाठी, ठाकूर रामनारायण कॉलेज ऑफ आर्टस् ऍण्ड कॉमर्स, दहिसर, वाणिज्य शाखेसाठी, दि स्कॉलर्स ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् कला शाखेसाठी,सेट रॉक्स ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड सायन्स, बोरिवली, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी, कमलादेवी गौरीदत्त मित्तल महाविद्यालय वाणिज्य शाखेसाठी, खार एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय, खार रोड विज्ञान शाखेच्या वाढीव तुकडय़ांस मंजुरी देण्यात आली आहे.