मुंबईत पाच ठिकाणी प्रक्रिया केंद्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी मुंबईत पाच ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी देवनार, कुलाबा, वांद्रे, मालाड आणि घाटकोपर येथील जागांची निवड करण्यात आली आहे. यामुळे सुक्या कचऱयाच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार आहे.

मुंबईत 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱया सोसायटय़ांना ओल्या कचऱयावर प्रक्रिया करणे पालिकेने बंधनकारक केले आहे. सध्या सुका कचरा पालिकेकडून वर्गीकरणानंतर विकला जातो. मात्र आगामी काळात सुक्या कचऱयाचे काय करणार असा प्रश्न पालिकेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर सुक्या कचऱयाच्या विल्हेवाटी जागांची निवड करण्यात आली आहे.

सुका कचरा प्रक्रिया केंद्रासाठी कुलाबा येथील सुरक्षा उद्यानजवळील 4,849.89 चौरस मीटर, कांद्रे (प.) येथील कांद्रे महानगर टेलिफोन एक्स्चेंजजकळील 840 चौरस मीटर, मालाड मालकणी परिसरातील 1,644.81 चौरस मीटर, देकनार शिकाजीनगर कचराभूमी मार्गाजकळ 5000 चौरस मीटर आणि घाटकोपर किरोल परिसरातील भटकाडी स्मशानभूमीजकळील 4,048 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांची निवड करण्यात आली आहे.

मुंबईत दररोज साडेसात हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामध्ये 800 ते एक हजार मेट्रिक टन सुका कचरा असतो. यातील 300 मेट्रिक टन सुक्या कचऱयाची किल्हेकाट खासगी संस्थांकडून लाकण्यात येते. तर 800 मेट्रिक टन कचरा ओल्या कचऱयासोबत डंपिंग ग्राऊंडकर जात आहे.