
बंदी असतानाही विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी सुपारी, तंबाखू, पानमसाला यांचा बेकायदेशीर साठा करून ठेवलेल्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने छापा टाकला. त्यावेळी तेथे 11 लाख 31 हजारांचा साठा मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
वाकोल्याचा नवविकास संकटा पांडे चाळीत एकाने गुटखा आणि सुंगधी सुपारी व तंबाखूचा साठा करून ठेवला असल्याची खबर प्रभारी निरीक्षक संतोष तावरे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक संजय सुर्वे तसेच लक्ष्मण गायकवाड व पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठय़ा प्रमाणात साठा करून ठेवलेला विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी सुपारी, तंबाखू, पानमसाला सापडला. याप्रकरणी सलीम अहमद वकील अहमद शेख (43) याला अटक केली आहे.






























































