
मराठा आरक्षणाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पूर्णपीठासमोर आरक्षणासंदर्भातील याचिकांवर उद्या बुधवार, 11 जून रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी मराठा आरक्षणाच्या याचिकांवरील सुनावणीसाठी हे विशेष खंडपीठ स्थापन केले होते.