खारमध्ये रिकाम्या इमारतीची गॅलरी कोसळली; कोणीही जखमी नाही

433

खार पूर्वेला रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या रिकामी इमारतीची गॅलरी रविवारी सकाळी कोसळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

खार पूर्वेला निर्मलनगरमध्ये म्हाडाची आकांक्षा गृहनिर्माण संस्था ही इमारत क्रमांक 9 ची चार मजली इमारत आहे. ही इमारत पुनर्विकासाअभावी रखडली असून सहा वर्षे ही इमारत बंद आहे. यात एकूण 40 कुटंबे राहत होती. मात्र, त्यापैकी 39 कुटुंबे दुसरीकडे राहायला गेली आहेत तर एक कुटुंब या इमारतीत राहत आहे. रविवारी सकाळी 6 वाजता उजव्या बाजूच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या गॅलरीचा काही भाग कोसळला. त्यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, पुनर्विकासाअभावी बंद असलेली ही इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीचा मागचा भाग हा खारच्या मुख्य रस्त्याला लागून आहे. रहदारीचा रस्ता असल्यामुळे तिथे नोकरदार, रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती शिवसेना नगरसेवक शेखर वायंगणकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या