यापुढे इच्छा असूनही जानला भेटणार नाही! मुलाच्या आरोपांवर कुमार सानू संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘माझ्या संगोपनाबाबत बोलायचा तुम्हाला काहीच अधिकार नाही’, असे विधान ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच स्पर्धक जान सानू याने आपले वडील, प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना उद्देशून एका मुलाखतीत केले होते. मुलाच्या या विधानावर कुमार सानू संतापले असून यापुढे इच्छा असूनही जानला भेटणार नाही, असे कुमार सानू यांनी म्हटले आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू म्हणाले, ‘मी जानसाठी काहीच केले नाही असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे मला खूप वाईट वाटतेय. 2001 मध्ये माझा घटस्फोट झाला तेव्हा तो खूप लहान होता. त्यामुळे त्याला काहीच आठवत नसेल. त्यावेळी त्याच्या आईने मागितलेली प्रत्येक गोष्ट मी त्यांना दिली आहे. मी माझा आशिकी बंगला देखील त्यांना दिला. जानला मी अनेकदा भेटलो होतो. पण यापुढे इच्छा असतानाही मी त्याला भेटणार नाही.’

पुढे ते म्हणाले, ‘बाबा मला शोमध्ये घ्या, असे जानने म्हटले त्यावेळी मी त्याला शोमध्ये घेतले. त्याने मला संगीत दिग्दर्शक- निर्मात्यांची भेट घालून देण्यास सांगितली. तेव्हा मी त्याला महेश भट्ट, रमेश तौरानी आदींना भेटवले. कारण या लोकांशी माझी खूप जुनी ओळख आहे. आता जानला काम द्यायचे की नाही हे त्याच्या टॅलेंटवर आधारित आहे. मी यावर काही बोलणार नाही.’