
मुंबईच्या साहित्यविश्वात स्वत:ची वेगळी ओळख बनवलेली संस्था अशी ओळख असलेला फोर्ट परिसरातील किताबखाना गुरुवार, 11 मार्चपासून पुन्हा सुरू झाला. त्यामुळे पुस्तकप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
गेल्यावर्षी 9 डिसेंबरला किताबखानाच्या उपाहारगृहात आग लागली होती. आग आणि ती विझवण्यासाठी मारण्यात आलेल्या पाण्यामुळे किताबखान्यातील सुमारे 45 हजार पुस्तके खराब झाली. आगीच्या घटनेनंतर नूतनीकरणाचे काम करण्यासाठी किताबखाना बंद ठेवण्यात आला. आगीच्या धक्क्यातून सावरत ही संस्था पुन्हा उभी राहील, अशी आशा पुस्तकप्रेमींना होती.
किताबखान्याचे संस्थापक अम्रिता सोमय्या आणि समीर सोमय्या यांच्या प्रयत्नातून किताबखाना पुन्हा तीन महिन्यांनी सुरू झाला आहे. सध्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशी किताबखान्याची वेळ आहे. किताबखानाला 10 वर्षे झाली आहेत. किताबखानामध्ये इंग्रजी वाचक जास्त येतात. मनोरंजनाच्या पुस्तकांपेक्षाकाही वैचारिक पुस्तके, बालसाहित्य तसेच संस्पृत, मराठी, हिंदी, गुजराती पुस्तकेही उपलब्ध होतात.































































