सुधा सिंगची जेतेपदाची हॅटट्रिक हिंदुस्थानी गटात केला पराक्रम

202

सुधा सिंगने हिने हिंदुस्थानी गटात नवा पराक्रम केला. तिने फुल मॅरेथॉनमधील महिला गटात 2.45.30 या वेळेसह शर्यत जिंकत नव्या विक्रमावर नाव कोरले. तिने मुंबई मॅरेथॉन शर्यत सलग तिसऱयांदा जिंकली. महाराष्ट्रातील परभणी येथील ज्योती गवाते हिने दुसरा आणि श्यामली सिंग हिने तिसरा क्रमांक पटकावला.

परभणीच्या कन्येला हवीय नोकरी

परभणीच्या ज्योती गवाते हिने अद्याप 40 मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. मुंबई मॅरेथॉनमध्येही ती सातत्याने चमकदार कामगिरी करीत आलीय. तरीही ती नोकरीपासून वंचित आहे. मुंबई पोलीसमध्ये तिला नोकरी मिळाली होती, पण मुंबई पोलिसातील ट्रेनिंगमुळे तिला स्पर्धांना मुकावे लागले असते म्हणून तिने ती नोकरी सोडून दिली.

पुरुषांमध्ये श्रीनू जिंकला

फुल मॅरेथॉनमधील हिंदुस्थानी पुरुषांच्या गटात श्रीनू बुगाता याने अजिंक्यपदावर हक्क सांगितला. त्याने 2.18.44 अशा वेळेसह शर्यत जिंकली. शेर सिंगने 2.24.00 अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. दुर्गा बहादूर याने 2.24.03 अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत तिसरे स्थान पटकावले.

आपली प्रतिक्रिया द्या