नव्या वर्षात नवी दिनदर्शिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन वर्ष सुरू होताच ओढ लागते ती नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेची. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सामाजिक संघटनांनी आणि संस्थांनी नागरिकांसाठी दिनदर्शिका प्रकाशित केली असून मान्यवरांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा पार पडला.

महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या 2021 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी आणि जिल्हाध्यक्ष युवराज दळवी उपस्थित होते.

पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक क@लेंडरचे प्रकाशन नुकतेच आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजाचे अध्यक्ष प्रवीण महाले, अभिषेक पुरव, चंदा कोरे, नंदा ठापूर, मोरेश्वर कोरे, अभिजित पाटील, योगेश पाटील, हर्षदा ठापूर आदी उपस्थित होते.

कारवार मराठी उत्कर्ष मंडळाच्या 2021 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन किशोर अवर्सेकर आणि अग्रेकर, सारसोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते