
चित्रपटातील झेंडा तुडवण्याच्या दृश्यावर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. “केवळ झेंडा पायदळी तुडवणे हे आक्षेपार्ह म्हणता येणार नाही, विशेषतः जेव्हा हा झेंडा राष्ट्राच्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या ध्वजाचे प्रतिनिधित्व करत नाही”, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी नोंदवले.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने ‘इन गलीयों में’ चित्रपटात सीबीएफसीने सुचवलेल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कुमार यांनी वकील सुशील उपाध्याय आणि अखिलेश यादव यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायाधीश मनीष पितळे यांच्या खंडपीठाने सुनावणी करत सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेप निराधार असल्याचे सांगत याचिका फेटाळली.
तथापि, उच्च न्यायालयाने सीबीएफसीने सुचवलेल्या काही सुधारणांशी सहमती दर्शवली असून याचिकाकर्त्याला मान्य केलेले बदल करून चित्रपटाची सुधारीत आवृत्ती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. सुधारित आवृत्ती मिळाल्यानंतर एका आठवड्यात चित्रपटाला UA-12 प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही CBFC ला देण्यात आले आहेत.
जावेद जाफरी, विवान शाह आणि अवंतिका दासानी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘इन गलीयों में’ हा चित्रपटाची कथा लखनऊमध्ये घडते. दोन वेगवेगळ्या समुदायातील नायकांवर चित्रपटातील कथानक आहे.






























































